मरण
मृत्यु म्हणजे एक साहसयात्रा . मृत्युमुळे सर्व ओझ्यातुन मुक्ति मिळते. आरामशीर मृत्यु ही खुप खर्चीक बाब असते. मृत्युला आपण थांबवु शकत नाही. तोच द्याळुपणे आपली प्रतीक्षा करीत असतो. जीवनात रस नसलेली माणसेच मरणाला जास्त घाबरतात . माणुस मृत्युपेक्षा मरणाअवस्थेला भितो.
ज्यांच्या जगण्याला काही अर्थ नसतो ते लोक आपल्या मृत्युला तरी कशी साथ करणार? मृत्युचे भय हे माणसाच्या मनामागे त्याच्या जन्मापासुनचं लागलेल असते.
धर्माची नल उभी करुन किंवा ईश्वराला अधीन होऊन माणसाने मृत्यु पासुन बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही तो भयमुक्त होण्याचा फक्त एकच मार्ग म्हणजे जीवनावर मनस्वी प्रेम करने आणि मनस्वी जीवन जगणे.
प्रत्येकाने आपला वेळ आपल्या आवडत्या कामात गुंतविला तर आपल्याला मृत्युचे स्मरण ही होणार नाही....
बरोबर आहे ना?
सध्या तर आता कोरोना सुरू आहे, परिस्थिति पहा तर माणुस माणसालाच घाबरत आहे. काय रे देवा तुझी लीला. जिकडे तिकडे शोशल डिस्टंटिग, मास्क लावा ईत्यादि. पण माझ्या अनुभवावरून सांगायचं झालं तर
मी ईथे कोणाच्या भावनांना दुख: वगैरे काही पोहचवतं नाही तर मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे बरं का.
लोक किती मृत्युला घाबरतात ना,
अगदी बरोबर आहे ज्या देवाने ईतका सुंदर जन्म दिला आहे तो याजन्माचा शेवट या स्वार्थी दुनियेत करणार नाही. आपण फक्त पृथ्वीवर एका प्रकारे पाहुण्या सारखे आहोत. कधी कोणाला काय होईल काही सांगता येत नाही. काय माहिती मी आज आहे उद्या नसेण. म्हणतात ना की मै आज हु कल नहीं, कल किसने देखा है. म्हणुन जे आहे त्यातचं समाधानी रहा, आणि मीपणा नष्ट करा. पण कधी कधी देव खुप वाईट करतो,
जशी आपल्याला चांगल्या लोकांची गरज असते तशी देवाला पण चांगल्या लोकांची गरज असते. म्हणुन तो आपल्या घरी चांगल्या लोकांना बोलवतो , कधी लवकर तर कधी उशीरा. मला म्हणतात सर्व की तु खुप चांगला आहे, देवा खरचं मी चांगला आहे का? मग तर तुला माझी गरज तर असेलचं मग बोलव की मला तुझ्या घरी, मला माझ्या आईला भेटायचं आहे. ज्याप्रकारे कम्प्यूटर मध्ये Recycle bin असतो तसा option पाहिजे देवा. कारण ज्यांचा मृत्यु झाला आहे त्यांना कधी पण भेटता आल असतं पण देवा मला माहिती आहे तु नेहमी अवघड रोल best actor लाच देतो होना.
आणि जर प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर दु:ख कोणाला कळलंच नसतं आणि दु:ख जर कळलं नसतं तर सुख म्हणजे काय हे सुध्दा कळलचं नसत. खरं सांगायचं झालं तर मला सुखं म्हणजे नक्की काय असतं हेच कळत नाही.
माझे विचार 💭 पटलं तर घ्या....
Comments
Post a Comment