आई माझी मायेचा सागर..




किती छान वाटतं ना आई म्हणायला, बोलायला ऐकायला जणु पुर्ण जगजं समावलेल आहे आई या शब्दात.पण माझं नशीब फुटकं असल्याने मला आईचं सुखं देवाने भोगु दिलचं नाही.😩 आई तुझ्याविषयी सांगायचं झाल तर अगदी प्रेमळ स्वभावाची, सर्वांशी आदराने वागणारी आणि कष्टाळु.आई तुझ्या विषयी जितक सांगण तितकं कमीच अगदी निशब्द.

आई म्हणु कोणा मी आई म्हणु कोणा मी
ऐक माझी हाक आई, कुठे गेलीस तु
रात्रंदिवस शोधतो तरी कुठे दिसत नाहीस तु
तुचं सांग आई मला...
आई म्हणु कोणा मी, आई म्हणु कोणा मी

जेव्हा जवळ होतीस माझ्या तु, तेव्हा काळजी किती घ्यायची
सारख कौतुक करुण माझ, थकत  नव्हतीस त
आता कौतुकाच्या जागी , भरपूर तिरस्कार मिळतो गं😭
तुचं सांग आई मला.... 
आई म्हणु कोणा मी, आई म्हणु कोणा मी

आधी शिक्षिका असल्याने आणि अभ्यासाची जाणिव उणीव असल्याने आई तु नेहमी अभ्यासाच्या बाबतीत एकदम सटीक होती. ताईला आणि मला नेहमी म्हणायची चांगला अभ्यास करा आणि आयुष्यात काहीतरी करुन दाखवा. आता पण आई तुझे हे शब्द आठवले की लगेच डोळ्यात पाणी येतं😪😪
नेहमी सर्वांना सांगायची आमच्याकडे कोणतीही property वगैरे काही नाही, पण माझा विपुल आणि माझी सोनल हीच आमची propertyआहे. माझ्या मुलांनी शिकक्षणामध्ये पैसे वाया घालवलेच नाही.  खुप चांगले निघाले  माझे मुलं. अशीच म्हणायची ना आई तु 😭 मग आज कुठे आहे तु😭.

या सायली काकु आई सोबत शिकक्षिका होत्या, आणि तेव्हा पासुन आईची आणि काकु ची घट्ट मैत्री झाली. आणि आजपर्यंत पण हे नात असचं टिकुन आहे . प्रत्येक वेळेस पैशाची जी मदत केली ती कधीच विसरणार नाही काकु 😘 आजपण कधी पैशाचा विषय केला तर काकु तुम्ही म्हणता की तुला जेव्हा नोकरी लागेल तेव्हा पैसे देशीन.खरचं म्हणतात ना की आपल्यापेक्षा परके लोक बरे ही गोष्ट एकदम खरी आहे मला तर पुर्ण अनुभव आला आहे.. धन्यवाद काकु.

आता नाही करु शकत गं, कशाचा पण हट्ट 
कारण माझे हट्ट पुरवणारी ,तु गेलीस मला सोडुन
कोणा सांगु दु खं, माझ कोणी समजुन घेत नाही गं
तुचं सांग आई मला आई म्हणु कोणा मी... 

काळजी करू नको गं आई , बाबाला त्रास देत नाही मी
आता नाही होत गं आई सहन, परत ये तु
नाती गोती सर्व आता, वैरी वाटतात सारी
तुचं सांग आई मला... 
आई म्हणु कोणा मी, आई म्हणु कोणा मी

ताईचं लग्न ताई चं लग्न किती हौस होती पण देवानी नाही पाहु दिलं. तरी मला माहिती आहे आई तुझा आशिर्वाद सदैव माझ्या सोबत  आहे  जसे श्री स्वामी समर्थ माझ्या पाठिशी आहेत. कधी स्वयंपाक केला नव्हता, मात्र आता मला सर्व बनवता येत  पोळ्या पण छान गोल गोल येतात. आणि आई मी  गणपती बाप्पा साठी मोदक केले होते, सर्व म्हणत होते की जशी चव तुझ्या आई च्या हातात होती अगदी तसेच मोदक बनवले तु तर, पण मी सांगितल त्याना माझी आई आणि माझी स्वामी आई माझ्या मदतीला आली होती. कोणतापण नवीन पदार्थ किंवा नवीन भाजी बनवली तर बाबा म्हणतात आईसारखीच भाजी बनवली तु तर. 
ताई पण आपल्या घरी सुखाने नांदत आहे . भाऊजीसारखा जोडीदार, भावासारखा दीर ,बाबांच प्रेम आणि आई ची माया मिळत  आहे, अजुन काय पाहिजे देव करो ती सदैव सुखातचं राहो.
ताई आली होती पहिल्यांदाच लग्नानंतर माझ्याकडुन जितकं जमलं तितक केल मी औक्षण करूनच आत आणलं. 
आई तुझी कमीच भासु दिली नाही. ताई साठी नवीन साडी घेऊन ठेवली होती आणि भाऊजीला आपल्यापसंदीचा ड्रेस घेऊन दिला. खरचं देव माझ्या पाठिशी आहे म्हणुन तो बुद्धि देतो.पण मनात आयुष्यभर आई तुझी खंत तर राहणारचं तु जेव्हा पासुन गेली तेव्हा पासुन माझ्या आयुष्यात Compromise हा डोंगर अगदी ठाम पणे  उभा असतो. मनात असंख्य गोष्ठी आहेत अस वाटतं की तुला सांगाव्यात, काही नवीन वस्तुसाठी हट्ट केला की कशी गं तु हट्ट पुरवायचीस , पण आता ते शक्यचं नाही आहे. बाबांजवळ जर कोणती गोष्ट सांगितली की मला माहिती आहे ते नाहीच म्हणतात म्हणुन मी नाही सांगत नाही देत बाबांना त्रास काही पण दुखलं तरी नाही सांगत तसं तर रोजचं दुखनं सुरुचं असतं कारण आई तु सर्व कामाचा भार आणि घराची जवाबदारी माझ्यावर टाकुन गेली ना. कधी कधी मला स्वत:ला आरश्यात पहायला सुद्धा वेळ भेटत नाही गं अभ्यास पण बरोबर होत नाही. रात्री अंथरूनात गेलं तर अस वाटत आता कुठुन तरी आई तु येशीलं आणि माझं डोक दाबुन देशीनं. पण नाही येत तु तुझ्या सोबत बोलतो तरी मात्र तु आपली फोटो मध्ये हसतचं असते. तु गेली तेव्हा पासुन सर्व बदलुन गेल आहे लोकांनमध्ये पण खुप बदल झाला आहे. कोणाचा फोन आला तर म्हणतात की मला गर्व आलाय तु तर विसरुन गेला आम्हाला,  लोकांना बोलण्याची सभ्यताचं नाही आहे तर कसे बोलणार म्हणुन मी कोणाला फोन करत नाही आणि मला नको आहे कोणाच  तात्पुरतं प्रेम.. आणि मी कोणाकडुण कोणतीच अपेक्षा ही ठेवत नाही.आई खुप केल तु सर्वांच माहिती आहे मला आणि मी पण कोणावर अवलंबुन नाही आहे.

किती आठवण येते गं तुझी, काही सुचत नाही
रात्री अंथरूनात गेल्यावर ,झोप काही येत नाही
 अर्ध्यी रात्र  संपुन, जाते तरी झोप काही येत नाही
तुचं सांग आई मला... 
आई म्हणु कोणा मी, आई म्हणु कोणा मी

देव देव करून माझ, तोंड काही थकत नाही
तरी देवाने इतक्या लवकर, का नेल काही समजत नाही
रोज माझ्यासारखी रडु , नको गं आई काळजी घे आपली
तुचं सांग आई मला... 
आई म्हणु कोणा मी, आई म्हणु कोणा मी

लीन पण तुझी खुप आठवण करतो त्याच्या आता पण लक्षात आहे आई तु जी अंगाई गात होती ती, आतापण ती अंगाई म्हण्टल्यावर तो खुप रडतो. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजले असतील लीन एकटाच आला आणि सर्व घरामध्ये आई तुला शोधत होता तुझ्या फोटोकडे पाहुन म्हणत होता अंटी  आजावो, अंटी आजावो आणि खुप रडत  होता मला पण रडायला  आल, काय माहित अचानक कशी त्याला आई तुझी आठवण आली तर. देवानी मला कोणत्या जन्माच्या पापांची शिक्षा दिली तर माहिती नाही .

या वेळेसची दिवाळी तर एकदम वाईट गेली.  नवीन कपड़े, फटाके, फराळ कहीच नाही.डोळ्यातले अश्रु काही थांबतचं नव्हते.  मी घराच्या बाहेर गेलोच नाही. डोक्यात विचित्र विचित्र विचार येत होते, अस वाटत होत बस झाल स्वत:ला एकदाचं संपुन घेतलेल बरं. कोणाचा फोन आला शुभेच्छा द्यायला तर त्याच्याशी एकदम छान हसत हसत बोलायचं . कशाला कोणाला त्रास.आई तुझ्यासाठी मी रांगोळीपण काढली . 
अस वाटत होत की फक्त पाच मि. साठी तरी आई तु येशीन पण नाही आली तु 😔 मला काही नको फक्त आई तुचं हवी आहे मला. शेवटच्या वर्षीचा निकाल आला माझा दरवेळेस सारखं या वेळेस पण मी तुलाच पहिले निकाल सांगितला मी. कशी म्हणायची आई तु विपुल आता शेवटच्या वर्षी चांगले गुण आनशील  मग तु MBA करशील , 😞 पण आई निकाल तर चांगला आला पण आई  मी आता MBA नाही करणार, जाॅब करणार आहे. 😔 

॥ श्रो स्वामी समर्थ ॥ 
        *अनुभवाचे  बोल*

👉 ज्यांनी तुम्हाला *दुखावले* आहे त्यांचेही आभार माना कारण तुम्ही मानसिकदृष्टय़ा *अधिक बळकट* व्हावे, यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे.

👉तुम्हाला ज्यांनी *फसवले* त्यांच्या विषयी देखिल कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला *शहाणपण* शिकवले आहे.

👉ज्यांनी तुम्हाला *नकार* दिला त्यांनाही धन्यवाद द्या कारण त्यामुळे *लढण्यासाठी*चेतवले गेलात.

👉ज्यांनी तुम्हाला *सोडून* दिले त्यांच्या विषयी चांगली भावना ठेवा कारण त्यांनी तुम्हाला *स्वावलंबी* बनण्याची प्रेरणा दिली

👉जे तुमच्यावर *टीका* करतात त्यांची गुणग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या *व्यक्तीमत्वात सुधारणा* करण्यासाठीच सहाय्य करत असतात.

👉तुमचे *पाय मागे* खेचणाराचे आभार माना कारण, ते तुमच्या *पायात बळ* निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात. 

👉तुम्हाला *कमी लेखणाऱ्यांचे* कौतुक करा. कारण ते तुम्हाला तुमच्यातील *कमतरता* किंवा *त्रुटी* दाखवून देत असतात.

👉तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी  कायम कृतज्ञ राहा...

आई तु काळजी करू नको स्वामी पाठिशी आहेतच.पण तुझी खुप खुप आठवण येते. आणि आयुष्यभर येतचं राहणार आई तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही, पाहता पाहता दहा महिने पुर्ण झाले तुला.आजपण मी देवाला ईतकचं मागतो  की माझी आई जिथे पण आहे तिला आनंदात ठेव आणि जितकं लवकर होईल तितकं मला देवा तुझ्या घरी बोलव  मग मी आपल्या आईसोबतचं राहायला मिळेल.😪😪😪
आता पण मी माझ्या जवळ तुझी बॅग आणि त्यात असलेले पैसे, अजुन असंख्य वस्तु सांभाळुन ठेवल्या आहेत.


दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई


Comments