किती छान वाटतं ना आई म्हणायला, बोलायला ऐकायला जणु पुर्ण जगजं समावलेल आहे आई या शब्दात.पण माझं नशीब फुटकं असल्याने मला आईचं सुखं देवाने भोगु दिलचं नाही.😩 आई तुझ्याविषयी सांगायचं झाल तर अगदी प्रेमळ स्वभावाची, सर्वांशी आदराने वागणारी आणि कष्टाळु.आई तुझ्या विषयी जितक सांगण तितकं कमीच अगदी निशब्द. आई म्हणु कोणा मी आई म्हणु कोणा मी ऐक माझी हाक आई, कुठे गेलीस तु रात्रंदिवस शोधतो तरी कुठे दिसत नाहीस तु तुचं सांग आई मला... आई म्हणु कोणा मी, आई म्हणु कोणा मी जेव्हा जवळ होतीस माझ्या तु, तेव्हा काळजी किती घ्यायची सारख कौतुक करुण माझ, थकत नव्हतीस त आता कौतुकाच्या जागी , भरपूर तिरस्कार मिळतो गं😭 तुचं सांग आई मला.... आई म्हणु कोणा मी, आई म्हणु कोणा मी आधी शिक्षिका असल्याने आणि अभ्यासाची जाणिव उणीव असल्याने आई तु नेहमी अभ्यासाच्या बाबतीत एकदम सटीक होती. ताईला आणि मला नेहमी म्हणायची चांगला अभ्यास करा आणि आयुष्यात काहीतरी करुन दाखवा. आता पण आई तुझे हे शब्द आठवले की लगेच डोळ्यात पाणी येतं😪😪 नेहमी सर्वांना सांगायची आमच्याकडे कोणतीही property वगैरे काही नाही, पण माझा ...